लायका पहला पहला प्यार…
द्वारा मिशेल आणि चलतचित्रपट
त्या दिवशी त्यांनी मला पार हॅंबर्ग वरून (जर्मनीतील त्यांच्या शहरातून) ६५३६ कि.मी अंतरावरून माझ्या राहत्या शहरी, मुंबईत फोन केला. मुंबईत नेहमीच पडतो तसा वेडा पाऊस रिमझीमत होता, छपरांवर आणखीन मोठ्याने वाजत होता…
त्यांचां आवाज : गंभीर, मखमली, त्यांचे कथन : स्वच्छ, त्यांचा स्वर : निर्मळ. त्यांचं वागण : मोहक. त्यांची आठवण: छायाचित्रासारखी. त्यांची विनोद बुद्धी: जर्मन नसल्यागत, आणि जगलेल्या व जगत असलेल्या तेजपुन्ज: आयुष्याचा काहीसा मादक निखार.
ज्यांने मला एवढ्या दयाळूपणे हॅंबर्ग वरून फोन केला ते नव्वद वजा तीन वर्ष वयाचे जयवंत उलाल, त्यांचं नाव मला चांगलच परिचयाचं होतं परंतू त्यांच्याशी ध्वनी संवाद प्रथमच होत होता. मुंबई, मंगलोर आणि सिनेमाच्या आठवणी उलगडत ते तासभर बोलले. त्यांच बोलणं मला पंचविशितल्या तरुणासारखं वाटलं, हे संभाषणाच्या अंती मी त्यांना सांगितले. त्यांचे कंप पावणारे हास्य मी ऎकले. आणि-
आणि जेव्हा ते सिनेछायाचित्रकार एम. (मधुसूदन) डब्ल्यू. मुकादम ह्यांच्याकडे उमेदवारी करू लागले तेव्हा त्यांच वय अर्थातच वीसच होते. आमचे संभाषण चालू असताना ते मधेच म्हणाले : “लायका ने माझे आयुष्य बदलले.” १९५० साली स्क्रू माउंट असलेला लायका हा शेवटचा जर्मन कॅमेरा होता.
प्रथम प्रिती होती आणि जणू काही ते शब्द बदलून सि. आय. डी. ह्या १९५६ च्या हिंदी सिनेमातील गाणे, ’लेके (लायका) पहला पहला प्यार, भर के आखों मे खुमार, जादू नगरी से आया है कोई जादूगर’ गुणगुणत होते. सि. आय. डी. आल्यासुमारास तरूण छायाचित्रकार जय उलालांनी सिनेछायाचित्रण क्षेत्र सोडून स्थिर छायाचित्रणाच्या क्षेत्रात स्वता:ला झोकून दिले. परंतु सुरुवातीचे वर्ष (दायरा, १९५३; मेहमान १९५३ आणि वचन, १९५४, च्या दरम्यान ) त्यांनी निपुण सिनेछायाचित्रकार एम. डब्ल्यू. मुकादम ह्यांच्या मार्ग्दर्शनाखाली सिनेछायाचित्रणचे शिक्षण घेण्यात घालवले आणि त्या काळच्या अनेक आठवणींचा इतिहास त्यांनी उलगडला. पुढील संभाषणात, उलाल ह्यांच्या भरपूर मदतीने, त्या इतिहासाच्या मागावर हे ताणे बाणे विणून हे भरजरी वस्त्र मी तुम्हा सर्व सम्यक दृष्टी च्या वाचकांसमोर मांडत आहे.
जय उलालांचे मुंबईच्या मोशन पिक्चर कला अकॅडमीतील शिक्षण
एम. डब्ल्यू. मुकादम सोबत काम करण्यापूर्वी जवान जय उलाल यांनी प्रसिद्ध निर्माता – दिग्दर्शक अब्दुल रहमान (ए. आर.) करदार ह्यांच्या खिरा नगर, सांताक्रुझ, मुंबई येथील मोशन पिक्चर अकॅडमी मध्ये सिनेछायाचित्रणाचे शिक्षण घेतले होते. ह्या संस्थेच्या मंडळावर सरोदवादक अली अकबर खान, आणि सिने दिग्दर्शक चेतन आनंद असे दिग्गज होते. चेतन आनंद ह्यांची फिल्म “नीचा नगर” ( १९४६) ने कॅन्स फिल्म फेस्टीव्हल १९४६ मध्ये ग्रॅड प्रिक्स डु फेस्टिव्हल ईटरनॅशनल डु फिल्म (सर्वोत्तम फिल्म) हा पुरस्कार विभागुन मिळवला होता. पाम द’ ओर (गोल्डन पाम) मिळवणारी ही एकुलती एक भारतिय फिल्म आहे. १५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र मिळण्याच्या एक वर्ष पुर्वीची ही घटना आहे. १४ वषीय जय उलालांनी युनियन जॅक उतरवून तिरंगा लहरताना पाहीला. स्वतंत्र भारताच्या नियतिच्या पुर्वसंकेताची हि गती होती.
मुंबई येथील मोशन पिक्चर कला अकॅडमीमध्ये दिग्दर्शन, संपादन, वगैरे अनेक व्यावहारिक अभ्यासक्रम होते. परंतु उलाल यांनी सिनेछायाचित्रणाची निवड करुन त्यात डिप्लोमा मिळवला. त्यांच्या उत्कृष्ट कामाकरीता त्यांना एम. डब्ल्यू. मुकादम यांजकडून खास प्रशस्तीपत्र मिळाले.
पुणे फिल्म इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ( नुतन नामकरण, फिल्म ऍण्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया १९६० ) पुर्वीच्या काळात सिनेछायाचित्रणकला व तंत्रज्ञान ह्या विषयातील प्रशिक्षण आणि अध्यापनशास्त्रातील काय सुविधा उपलब्ध होत्या याची मला उत्सुकता असल्याने, मुंबई येथील मोशन पिक्चर कला अकॅडमीमधील अभ्यासाबद्दल सांगण्याची तसेच, हे क्षेत्र येवढ्या लवकर सोडून जाण्याबद्दल
अधिक माहीती देण्याची मी उलाल यांना विनंती केली. त्यानी सांगितले —
जय : मी जेव्हा छायाचित्रण शिक्षण संस्थेच्या शोधात मुंबईला आलो तेव्हा येथे अशी कोणतीही संस्था मला आढळली नाही. त्या मुळे माझ्यापुढे मोशन पिक्चर कला अकॅडमीमध्ये दाखल होण्याव्यतिरीक्त दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मुळात माझे स्वप्न छायाचित्रकार होण्याचे होते. सिनेछायाचित्रकार बनण्यात मला जरा ही रस नव्हता.
अमृत : ह्या शिक्षणसंस्थेत कशा प्रकारे शिकवले जात असे?
जय : सगळं फार चांगलं होतं. कॅमेरा वापरायचा खुप अनुभव मिळाला. ३०० रुपये महीना हे तस महागडच होतं. परंतु नशीब बलवत्तर होते, अलि अकबर खान यांच्या मदतीमुळे मला शिष्यवृत्ती मिळाली व मी संस्थेत दाखल होऊन माझे शिक्षण साधारण शुल्क भरून होऊ शकले.
अमृत : तुमचे सहध्यायी कोण होते, तुम्हाला आठवतात का?
जय : सिनेछायाचित्रण वर्गात माझ्या सोबत आठ विद्यार्थी होते, एक दक्षीण आफ्रिकेतील गोरा, केरळचा एक मुलगा व एक मल्याळी होता.
अमृत : सिनेछायाचित्रणाव्यतिरीक्त दुसरे कोणते अभ्यासक्रम त्या संस्थेत शिकवले जात?
जय : अभिनय, दिग्दर्शन, ध्वनी संकलन, प्रकाशयोजना आणि इतर काही गोष्टी. सा-या बॉलीवुडला त्या काळी तात्रीक सुधारणाची गरज होती. ( एफ टि टि आय च्या स्थापनेच्या वेळीही अशीच परिस्थीती होती –अमृत )
अमृत : त्या काळातील आणखी काय आठवणी आहेत?
जय : दिग्दर्शन वर्गातील के. के. नारायण नावाच्या म्हैसुरच्या एका सधन विद्यार्थ्याशी माझी मैत्री झाली. त्याच्या आईने माटुंगा पश्चिम येथे मोठा विलासी फ्लॅट खरेदी केला होता. (माहीम आणि दादर ह्यांच्या मधील मुंबईच्या पश्चिम रेल्वेवरील माटुंगा रेल्वे स्टेशन). नंतर मी त्याच्या सोबत राहू लागलो, जेथे सरदार मलिक सुद्धा रहात असत. तेच प्रसिद्ध संगितकार सरदार मलिक जे औलाद या चित्रपटस त्यांनी दिलेल्या संगितामुळे आज ही स्मरणात आहेत. पुढिल दशकभर आमची मैत्री कायम होती.
नोंद : १९५४ सालचा हिंदी चित्रपट ’औलाद’ सिनेछायाचित्रकार राजोध ठाकूर यांनी छायाचित्रीत केली होती. बलराज सहानी, उषा किरण आणि निरुपा रॉय ह्यांच्या त्यात प्रमिख भुमिका होत्या. दिग्दर्शन मोहन सैगल यांनी केले होते. औलाद मधील तलत महमुद यांनी गायलेले ’दुनिया तस्विर है रोते हुए इन्सानो कि’ हे गाने तुम्हाला आठवत असेल. ते सरदार मलिक यांनी लिहीलेले होते. त्यांचा पुत्र, अन्नु मलिक बॉलिवूडमधिल प्रतिथयश संगितकार आहे. सरदार मलिक (१९२५ – २००६) हे १९५३ सालातील ठोकर आणि सारंगा (१९६१) मधिल गीतांकरीता ओळखले जातात . सारंगा (१९६१) मधील मुकेश यांनी गायलेल्या सारंगा तेरी याद मे” हे गीत भारतातील संगितप्रेमी आज ही गुणगुणतात. — अमृत)
अमृत : जय उलालांकरिता तो फार थरारक काळ होता. परंतु त्यांच्या एम. डब्ल्यु. मुकादमांच्या सोबत केलेल्या उमेवारीचा त्यांचा काय अनुभव आहे हे सांगण्याची मी त्यांना विनंती केली.
जय : नशिबाने, मोशन पिक्चर आर्ट ऍकॅडमी मधील शिक्षणानंतर मला एम. डब्ल्यु. मुकादमांच्या सोबत उमेदवारी करायला मिळाली. त्या वेळी मुकादम तीन चित्रपटांवर काम करत होते, दायरा, मेहमान आणि वचन. हे चित्रपण पुर्ण होईपर्यंत जरी मी मुकादमांसोबत काम करू शकलो नाही तरीही मुकादमांचा माझ्यावर पुर्ण विश्वास होता. हे खुप जबाबदारीचे काम होते. त्या मध्ये स्टुडीयोमध्ये आकाशाची प्रकाश योजना, कॅमे-यात फिल्म भरणे. क्रेन किंवा ट्रॉलीवर कॅमेरा हाताळताना पाच ते दहा मिटर वरील क्लोज अप साठी फोकसिंग करणे हि महत्वाची कामे ते माझ्यावर सोपवत. क्रेन शॉट मुकादम स्वतांच घेत, त्याच्या सोबत बसून मी अतिशय कार्यक्षमतेने फोकसिंग हाताळत असे. दिग्दर्शक कमाल अमरोहींही अनेकदा मला ” मुला, छान काम केलेस” असे म्हणून पाठीवर थोपटून शाबासकी देत असत. मी कधी ही आउट ऑफ फोकस गेलो नाही आणि त्याचं त्यांना कौतुक होतं. तुम्हाला ठाऊक आहेच, दायरा मध्ये कॅमे-याच्या काही कठीण हालचाली आहेत.
आणि त्या नंतर, एम. डब्ल्यु. मुकादमांच्या सोबत बॉंबे स्टुडीयो मध्ये छायाचित्रण करताना स्टुडीयोधील बागे मध्ये मला त्यांच्या मोकळ्या वेळात, अनेक सिनेकलाकार, सिनेतारे-तारका आराम करताना दिसत. तेथे काम करत असल्याने व स्थिर छायाचित्रणात रस असल्याने मी एक जुना रोलीकॉर्ड कॅमेरा घ्यावा असे ठरवून तो घेतला आणि अनेक फोटो अनौपचारीकपणे काढले. भविष्यात व्यावसायीक छायाचित्रकार होण्यासाठी हे एक महत्वाचे वळण ठरले.
अमृत : दायरा हा चित्रपट जरी व्यवसायीदृष्ट्या अयशस्वी ठरला तरी तो सिनेमाप्रेमी व टिकाकार आजही त्याला खास पंथातील म्हणून उल्लेखतात. माझ्या माहीतीप्रमाणे हा चित्रपट मुंबईच्या वेस्टर्न रेलेवे वरील दुरच्या मालाड उपनगरातील बॉंबे टॉकिज स्टुडीयो मध्ये चित्रित केला गेला आहे. मी लिहीलेले “फ्रान्ज़ ओस्टेन ऍन्ड द बॉंबे टॉकिज : अ जर्नी फ्रोम म्युनिच टू मालाड” हे पुस्तक २००१ मध्ये गोयथे इन्स्टीट्युटने (मॅक्स मुल्लर भवन मुंबई) प्रकाशित केले आहे. आपल्या सतर्क स्मृतीकोशातून ह्या स्टुडीयोसंबंधी काही आठवणी आपण सांगितल्या तर मला आवडेल.
जय : फार काही आठवत नाही, परंतु येवढं आठवतं की तो प्रचंड मोठा आणि उत्कृष्ट स्टुडीयो होता. दुदैवाने तोपर्यंत त्याचे संस्थापक हिमांशु राय याचा स्वर्गवास झाला होता व त्यांच्या पत्नी देविका रानी ह्यानी स्टुडीयोचा निरोप घेतला होता. पुर्वी सांगितल्याप्रमाणॆ छायाचित्रणाच्या शॉटसं मधील अवधीत (ज्यावेळी छायाचित्रण, त्याची तालीम, मेक अप बंद असे, किंवा भोजनाच्या सुट्टीत) जेव्हा कलाकार आराम करत अथवा आपआपसात गप्पा टप्पा करत असत त्यावेळी मी माझ्या रोलीकॉर्डने त्यांचे नैसर्गिक वागणे व ढंग टिपत असे. मीना कुमारी ( दायरा मधील शितल), नसीर खान (दायरा मधील शरण कुमार), नर्गिस, दिलीप कुमार आणि दुस-या चित्रपटांमध्ये काम करणारे, छायाचित्रण पहायला आलेल्या इतर कलाकारांची छायाचित्रे मी काढत असे. खर सांगायचं तर हळूहळू ह्यातून मिळणारे माझे उत्पन्न असिस्टंट कॅमेरामन म्हणून मिळणा-या पैश्यांपेक्षा अधिक होते. छायाचित्रकार होण्याचे माझे स्वप्न साकार होताना मला दिसू लागले.
मध्यांतर : लंच ब्रेक
आम्ही इ मेल द्वारा शब्दांनी जुळलेले आहोत, प्रतिमा वा ध्वनी द्वारे नाही. उलाल यांनी मला सांगितले, ” मला आता थांबायला हवं. भोजनानंतर मी दुसरा भाग पाठवून देतो.” हॅम्बर्गमध्ये १४.०० आणि मुंबईत १७.३० वाजलेले होते. गतकालातील स्टुडीयो आणि चित्रपट निर्मीतीबद्दल जाणून घेण्यास मी फारच उत्सुक असल्याने मी उलाल यांच्याकडे अधिक माहीतीची काहिश्या जोशातच मागणी केली. त्याचे माझ्याशी वागणे नेहमीच शांतपणाने व उदारतेने असते. ते आज ही तारुण्याच्या उत्साहात असतात.
दुसरा भाग सुरु होण्यापुर्वी मी मालाडच्या बॉम्बे टॉकिज स्टुडीयो विषयी काही सांगू इच्छीतो. सुमारे १९५२ -५३ साली, जेव्हा सिनेछायाचित्रकार एम. डब्लु. मुकादम (ज्यांच्या हाताखाली जय उलाल यांनी उमेदवारी केली) दायराचे चित्रण करत होते ; बॉम्बे टॉकिज लिमीटेड ही कंपनी व स्टुडीयो (आशियातील उत्तम स्टुडीयोत गणला जाणारा), शेवटचा श्वास घेत होते. १९९५० च्या सुरुवातीला कामगार संघटनांची मदत मिळूनही स्टुडीयोची घसरण सुरुच होती. त्या नंतर तेथे फणी मुजुमदार यांचा एकच चित्रपट, बाढबान, हा १९५४ मध्ये निर्मिला गेला.
वेगळ्या शब्दांत सांगायचं तर, २० वर्षीय जय उलाल यांनी हा भव्य स्टुडीयो अस्तित्वात असताना पाहीला. आज ही वास्तु अतिशय वाईट अवस्थेत आहे. मी स्वता: मुंबई हेरिटेज कमिटीला पत्रे लिहून संपुर्ण नष्ट होण्या पुर्वी ह्या वास्तुला वाचवायचा किंवा येथील महत्वाचा इतिहासाचे दस्तावेजीकरण करण्यासाठी संपर्क साधायचा प्रयत्न केला. कदाचित खाजगी मालकीत गेल्याने असेल, पण कोणतीही परिणामकारक पावले उचलली गेली नाहीत. – अमृत.
उलाल त्यांचे भोजन आटोपुन परत आले. त्यांनी लिहीले, ” माझे भोजन झाले आहे. येथे पाऊस पडत नसून छान उन पडले आहे.”
भाग दोन : हॅम्बर्हमध्ये भोजनाच्या सुटीनंतर, वयाच्या ८७व्या वर्षीही त्यांना वामकुक्षीची गरज नाही
जय : रोलीकॉर्ड कॅमे-याने माझे नशीब उघडले!! नर्गिस, मीनाकुमारी, गीता बाली, अशोक कुमार आणि इतराच्या सहजपणे मी काढलेल्या छायाचित्रांची बरीच प्रशंसा झाली. तदनंतर दत्त कुटुंबाबरोबर माझी गहीरी मैत्री झाली. १९८० साली मुंबईतील प्रिन्स ऑफ वेल्स वस्तुसंग्रहालय (आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय)मधील कुमारस्वामी हॉलमध्ये नर्गिस यांनी माझ्या छायाचित्राण्चे प्रदर्शन भरवले व दिनांक १९ जनेवारी १९८० रोजी त्यांच्याच हस्ते त्याचे उद्घाटन झाले. खर तर त्यांनी स्वता:च्या खर्चात, हॉलचे भाडे, फ्रेम बनवणे, फोटों रचनात्मकपणे लावणे, आमंत्रणपत्रिका बनवून छापणे आणि माध्यमांना निमंत्रीत करणे हे सगळे केले.
आपल्या दोन लेकींसोबत, नर्गिस माझ्या हॅम्बर्गमधील घरी सुट्टीत वास्तव्याला येत. त्यांच्या लेकींना कोपेन्हेगेन येथील लिटल मरमेड पहायची होती तेव्हा आम्ही गाडीने तेथे गेलो होतो आणि पुर्ण दिवस तेथे घालवला. आजही आम्हा दोन्ही कुटुंबातील स्नेह कायम आहे. संजु (संजय दत्त) च्या उपचाराकरीता संजु व सुनिलदत्त महिनाभर हॅम्बर्ग येथे राहीले होते.
अमृत : सुरुवातीला तुम्ही असे म्हणालात की लायका कॅमे-याने तुमचे आयुष्य बदलून गेले. हा जुना लायका कॅमेरा तुमच्या कुणा नातेवाईकाचा होता. तुम्हाला ठाउक आहे, ह्या अपल्या संभाषणाच्या ह्या लेखाचे नाव सि. आय. डी. चित्रपटातील (१९५६), लेके पहिला पहिला प्यार, वरून घेतले आहे. राज खोसलाने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट गुरु दत्त ने निर्मिला. मला खात्री आहे, तुमच्यात मंगलोर संबंधीत काही संबंध असेल. म्हणजे तुम्ही व गुरुदत्त (१९२५ – १९६४).
जय : होय. नक्कीच. गुरु दत्तची आई व माझी आई मंगलोरमधील एकाच शाळेत शिक्षीका होत्या. गुरु दत्त यानी त्यांच्या गीता रॉय बरोबरच्या विवाह सोहोळ्याची छायाचित्रे मला काढावयास निमंत्रीत केले होते. त्यांच्या माटुंगा येथील घरी अतिशय निवडक निमंत्रतांसोबत साधेपणाने हा समारंभ पार पडला. लग्नाची छायाचित्रे काढावयास सांगताना त्यांनी एक अट घातली होती; लग्नाची छायाचित्रे काढल्यावर, सगळे फिल्म रोल मी त्यांच्या स्वाधीन करावे. मी तसे केले ही. आणि परिणामस्वरूप, त्या घटणेचे एकही छायाचित्र माझ्या जवळ नाही. लग्नाची सर्व छायाचित्रे मी माझ्या जुन्या जाणत्या लयकाने काढली होती. [हा साधा लग्न सोहळा २६ मे १९५३ रोजी सम्पन्न झाला. अमृत,]
गुरु दत्त यांचा धाकटा भाऊ, अत्माराम पदुकोन (१९३० – १९९४) माझा जवळचा मित्र होता. मी त्याच्या नियोजीत वधुच्या घरी, नागरत्न कुटुंबियांसोबत हिंदू कॉलनी येथे राहीलो आहे. त्यांचा फ्लॅट खूप विस्तिर्ण होता. आणि ती स्वता: प्रसिद्ध शास्त्रोक्त नृत्य नर्तिका होती. कालांतराने तिचा आत्माराम बरोबर विवाह झाला. त्याला दैवगती होईपर्यत आमचा स्नेह कायम होता. आमच्या वर्षिक सुट्टीतील मुंबई भेटीत मी व माझी पत्नी रजनी त्यांना भेटत असू. [गीता रॉय आणि त्यांचे कुटुंब माटुंगा जवळच्या दादरला रहात असत.]
अमृत : आणि सिनेछायाचित्रकार एम. डब्ल्यु. मुकादम जे आपले मार्गदर्शक होते, त्याच्या संपर्कात आपण होतात का?
जय : बॉलिवुडमध्ये काम करणे सोडल्यावर, त्यांनी कॅमेरा आणि तत्संबंधी उपकरणे भाड्याने देण्याचा व्य्वसाय सुरु केला. त्यांच्याकडे उत्तम अद्ययावत कॅमेरे असत. कधी त्यांना कॅमे-यासाठी सुटे भाग लागले तर ते माझ्याशी संपर्क साधत. जर्मनीहुन ते मिळवण्यासाठी मी त्यांना मदत करत असे. अनेक वर्षे मी त्यांच्या संपर्कात होतो.
अमृत : बॉम्बे टॉकिज स्टुडीयोमध्ये दायरा चे चित्रण करतानाच्या काही खास आठवणी आहेत काय? चित्रपट इतिहाससंशोधक, सिद्धांन्तवादी आणि क्युरेटर ह्या नात्याने दायरा या चित्रपटाला, त्याच्या वेगळ्या मितीमुळे त्याचा छायाचित्रणातील वेगळेपण, निराळी चौकटींची मांडणी, आणि क्लोजअप्स यांना माझ्या दृष्टीने खास महत्व आहे. शेवटचे दृष्य दोन मिनीटांहून अधीक आहे, त्यातील गर्भीत स्थीरता अत्यंत गतिमान आहे. त्यातील ऎहीक लवचिकता, आठवणी आणि मनाचा कल खोलावते, अस्वस्ठ उदासिनतेला जन्म देते. ह्या अनोख्या दृश्याने दायराचा शेवट होतो. लोकप्रिय चित्रपटासाठी हे धोकादायक वाटलं तरी कमाल अमरोहीमधील कलाकारासाठी हा धोका पत्करणं हा त्याच्या चित्रपट निर्मितीतला प्रघात होता, असं मला वाटतं.
जय : दिग्दर्शक कमाल अमरोही अतिशय स्नेहशिल होते. अनेकदा ते मला त्यांच्या आणि मीनाकुंमारी सोबत किंवा इतर सहका-यांबरोबर जेवायला बोलवत असत.
अमृत : वचन बद्दल काही सांगाल का? त्याचे छायाचित्रकार प्रताप दवे होते. मला वाटतं याचे छायाचित्रण अंधेरी पुर्व येथील अशोक स्टुडीयो आणि महलक्ष्मी येथिल फेमस स्टुडीयोत झाले. ह्या चित्रपटाचा निर्माता देवेन्द्र गोयल होते. राज ऋषी दिग्दर्शीत वचन ह्या चित्रपटात गीता बाली, राजेन्द्र कुमार बलराज व इतरांनी भुमिका केल्या होत्या. त्याच्या काही आठवणी आहेत का?
जय : होय, तो चित्रपट बराचसा अंधेरीतील स्टुडीयोत चित्रित केला गेला. बहुतांश वेळ मी ह्याच स्टुडीयोत काम केले. पण ताडदेवच्या फेमस स्टुडीयोत नाही . माझ्या उमेदवारीच्या काळात (उदा. दायरा) मला वेतन मिळत नसे. परंतु वचन बनत असताना देवेंद्र गोयल मला नाममात्र मोबदला देत असत. नक्कीच मुकादम साहेबांनी त्यांना तसे करायला सांगितले असावे. जाण्या येण्याची कोणातीच अडचण नव्हती; गोयल प्रथम मुकादम यांना दादर येथील त्यांच्या घरून, नंतर मला माटुंगा पश्चिम येथून आणि राजेन्द्र कुमार यांना वांद्रे पश्चिम येथून आपल्या गाडीने घेऊन येत. त्या काळात राजेन्द्र कुमार हे होतकरू कलाकार असल्याने, वांद्र्यातील स्वस्त अशा मरिना गेस्ट हाऊस मध्ये रहात असत. गाडीची वाट पहात ते त्याच्या समोरील रस्त्यावर उभे रहात असत, आणि तेथून आम्ही सगळे अंधेरी स्टुडीयोकडे जेथे वचन चे छायाचित्रण होत होते तेथे प्रयाण करत असू.
मला आठवतं, सरदार मलिक यांनी मला तेव्हा संघर्ष करत असलेल्या राजेन्द्र कुमार बरोबर मैत्री करू नकोस असं सांगितलं होतं. तेव्हा कुणाला कुठे ठाऊक होते की तोच राजेन्द्र कुमार (१९२९ – १९९९)बॉलीवूडचा प्रसिद्ध जुबिली कुमार बनणार आहे! त्याचे सर्व चित्रपट हीट झाले, जुबिली साजरे करत चालले. (२५ वा ५० आठवडे)
प्रताप दवे माझा मित्र होता; तो आणि त्याची पत्नी बोरीवलीच्या एका लहान फ्लॅटमध्ये रहात असत. [प्रताप दवे दायरा चित्रपटासाठी दत्ताराम व सुर्यकांत यांच्या सोबत सहाय्यक छायाचित्रकार म्हणून करत होते, आणि वचन साठी तो ऑपरेटींग छायाचित्रकार म्हणुन काम करत होते. एम, डब्लु. मुकादम मुख्य छायाचित्रकार आणि उमेदवारी करणारे जय उलाल त्यांचे सहाय्यक होते. –अमृत ]
जय उलाल यांच्या स्मृतीकोषात (ब. ९ सप्टेंबर १९३३) आठवणींचा प्रचंड साठा आहे आणि तो मिळविण्यासाठी अनंत काल लागेल. परंतु हॅम्बर्ग मुंबईच्या वेळेच्या चार तास मागे आहे आणि त्यांना संध्याकाळाचे भोजनही करावयाचे आहे, परंतु-
परंतु भोजनाच्या ऎवजी उपोद्घात
पुन्हा माझ्या शिर्षकाकडे वळू या: लायका पेहला पेहला प्यार …
अमृत : जय, देव आनंद (१९२३ – २०११) व वहिदा रेहमान यांच्या प्रमुख भुमिका असलेल्य सि. आय डी. चित्रपटातिल हे गाणे तुम्हाला ठाऊक आहेच, त्यात मी आपल्या आयुष्यात बदल घडवून आणणा-या लायका संबंधाने थोडा बदल केला आहे. भोजनापुर्वी तुम्ही आणखिन एखादी कथा नक्कीच सांगाल.
जय : १९७० सालची गोष्ट आहे. मी फ्रॅंकफर्ट ते मुंबई, एयर इंडीयाच्या विमानाने प्रथम वर्गात प्रवास करत होतो. मी मार्गिके लगत बसलो होतो, आणि माझ्या बाजुच्या खिडकीजवळ कोण बसलं होतं ठाऊक आहे? जे. आर. डी टाटा. माझी जीवन कहाणी , मी स्टर्न मासिकासोबत कसा आलो हे जाणून घेण्याची त्यांना खूप उत्सुकता होती.
आम्ही दुस-या रांगेत होतो. पहिल्या रांगेत एक देखणि व्यक्ती बसलेली होती. त्यांनी माझ्या कडून आदबीने मासिक मागितले. थोड्या वेळाने जे. आर. डीं ने सांगितले, तो बॉलिवूडचा प्रसिद्ध सिने तारा देव आनंद आहे. प्रथमता: मी त्याला ओळखले नाही, तो खुप तरूण असताना मी त्याला पाहीले होते. नंतर आम्ही गप्पा मारल्या. एकमेकांना स्वता:ची भेटपत्रे दिली. त्यांनी मला त्यांच्या जुहुच्या घरी येण्याचे निमंत्रणही दिले होते. परंतु माझ्या पुढील मुंबई भेटींत ते मला कधीच जमले नाही.
अमृत : काय ही त्रयी! जे. आर. डी, देव आनंद आणि जय उलाल… जणु एयर इंडीयाचा महाराजा राजेशाही आदबीने लवला… शेवटी आपण जयवंत आहातच, विजेते …
कृपया जाऊ नका, ही तर भोजनानंतरची मिठाई आहे…
पाच ते आठ वर्षांनंतर…
जे. आर. डी. टाटा आणि देव आनंद यांच्यासोबत फ्रॅंकफर्ट ते मुंबई, एयर इंडीयाच्या विमानप्रवासानंतर सुमारे पाच ते आठ वर्षांनंतर मुंबई / बॉम्बे येथील ताज महाल होटेलात…
जय : माझी पत्नी रजनी व मी पुन्हा मुंबईत आलो. एके संध्याकाळी, ताज महाल हॉटेलातील भोजनानंतर, आम्ही प्रवेशद्वाराजवळ गाडीची वाट पहात थांबलो असताना, तेथे जे. आर. डी. आले. चालताना त्यांनी मला पाहीले. माझ्या कडे पहात ते थबकले आणि म्हणाले, ” तुम्ही हॅम्बर्ग येथील स्टर्न मधील आहात ना? कृपया या, आपण कॉफी घेऊ या.” आम्हाला एका तातडीच्या महत्वाच्या भेटीसाठी जायचे असल्याने आम्ही त्यांना धन्यवाद दिले व विनयशीलपणे नाही म्हंटले. परंतु पहा ना, काय स्मरणाशक्ती आहे ह्या वृद्ध सद्गृहस्थाची आणि केवधी ही नम्रता. थोर आख्यायिका बनलेल्या ह्या महान भारतिय व्यक्तीच्या स्मृती माझ्या मनात कायम रहातील ….
वाढदिवसाची मेजवानी : सार्वजनिक आमंत्रण
९ सप्टेंबर २०२० : आज जय उलाल यांचा ८७वा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाच्या मेजवानीचे सार्वजनिक आमंत्रण, सगळे या…
जर मीना कुमारी (१ ऑगस्ट १९३३ – ३१ मार्च १९७२) आज जिवीत असत्या तर त्या नाक्कीच आपल्या सोबत सामील झाल्या असत्या. जय उलालांपेक्षा त्या फक्त एक महीन्याने मोठ्या होत्या. आणि आपल्याला दोन वाढदिवस साजरे करता आले असते…
जय, हा दिवस पुन्हा पुन्हा येवो हि सदिच्छा…
अमृत गांगर- जय उलाल, मुंबई-हॅम्बर्ग, २९ ऑगस्ट २०२० – ४ सप्टेंबर २०२०
Amrit Gangar
Mumbai-based film theorist, curator and historianHe has to his credit three books on German filmmakers and a musicologist, viz. (a) Franz Osten and the Bombay Talkies: A Journey from Munich to Malad, 2001; (b) Paul Zils and the Indian Documentary, 2003; (c) Walter Kaufmann: The Music that Still Rings at Dawn, Every Dawn, 2013. All these three books have been published by the Goethe Institut (Max Mueller Bhavan), Mumbai.
Gangar was the consultant curator of the National Museum of Indian Cinema, Mumbai which is India’s first national film museum under Government of India. He has also curated film programs for the Kala Ghoda Artfest, Mumbai; Kochi-Musziris Biennale, Kerala; Danish Film Institute, Copenhagen, etc. He has presented his theory of Cinema of Prayoga at various venues in India and abroad, including the Pompidou Centre, Paris; the Tate Modern, London; Kala Bhavana, Santiniketan; West Bengal; NCPA, Mumbai, etc. He writes both in English and Gujarati languages and has been awarded by the Gujarat Sahitya Akademi, Gandhinagar.
Aniruddha Cheoolkar
AFIPAniruddha Cheoolkar is doing photography, some commercial but mostly pictorial for last five decades. His special interest in photomicrography, taking photos through the microscope, has helped many post graduate and doctoral students in thefield of biology. Working at an environmental research laboratory he found time to teach photography, to write about his tours and experiences. He loves to read. He expresses himself fondly in poetry. His book titled “30@30” showcasing the interviews of 30 photographers was published by Jagdish Agarwal, founder of DPL.