शाम मंचेकर
छायाचित्रकलाकार
छायाचित्रण ही कला आहे का? हा एक पुरातन वाद आहे.परंतु आपल्या कलापुर्ण निर्मितीने छायाचित्रणकला ही कलाविश्वाचे अविभाज्य अंग आहे हे ठामपणे समोर मांडणा-या मोजक्या सक्षम कलाकारांपैकी शाम मंचेकर हे एक आघाडीचे छायाचित्रकार आहेत. त्यांचे कॅनव्हास, येथे मी कॅनव्हास हा शब्द कलाकृती साकारण्याचे माध्यम ह्या अर्थाने वापरला आहे, आपल्या काळजाला भिडतात, मनालाआनंद देतात, भावनांची स्पंदने निर्माण करतात. मुर्त असो वा अमुर्त त्यांच्या प्रतिमा त्यांच्या विस्मयकारक प्रतिभेची साक्ष देतात.आपल्या देशात आणी जगभरात त्यांच्या सतत एकाग्रपणे सुरू असलेल्या कलानिर्मीतीचे कौतुक आणि आदर केला जात आहे.
उच्च उत्पन्नाचा अभाव, आणी सर्वसाधारण बालपणातून त्यांनी प्रगती करून आयुष्यात काही एक बनायची उर्मी अंगी बाणली. सिंधुदुर्गमधील खारेपाटण येथे त्यांचे मॅट्रीकपर्यंतचे शालेय शिक्षण झाले. प्रथम वर्गात उत्तीर्ण होणा-या थोडक्या विद्याथ्यांपैकी ते एक होते. महाराष्ट्रातील आपल्या छोट्याश्या गावातून ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईत आले. बी. ए. च्या प्रथम वर्षात असताना ते मेव्हण्यांसोबत त्यांच्या चाळीतील खोलीत राहीले. त्यानंतर ते मालाड ह्या मुबईच्या उपनगरात अधीक चांगल्या घरात स्थलांतरीत झाले. नोकरी साठी त्यांनी आयुर्वीमा महामंडळात कारकुनाच्या पदासाठी अर्ज केला आणी त्यांची सहजच निवड झाली. खात्यांतर्गत परीक्षा उत्तम गुणांनी पास झाल्याने, लगेचच त्यांना पदोन्नती मिळाली. त्या नंतर त्यांना आयुर्वीमा महामंडळाच्या कर्मचारी निवासात घर मिळाले. शाम म्हणतात, ” त्या नंतरचा प्रवास तसा सुखकरच होता.”
सर्व सामान्यपणे हे सगळ ठीक चाललेलं असताना त्यांच्या मनात काही वेगळाच घोळत होतं. त्यांना त्याच्या कला निर्मीती, छायाचित्रणची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. महाविद्यालयीन शिक्षण करत असताना त्यांनी जे जे कला महाविद्यालयातुन ओडिओ व्हिज्युअल मधील प्रशिक्षण आणी छायाचित्रणाची पदविका मिळवली होती. ह्या पात्रतेद्वारे त्यांनी प्रसिद्धी खात्यात बदली करून घेतली. येथे त्यांना त्यांच्या कलाविष्कारास वाव मिळाला. खात्यातील छायाचित्रकारास ते मदत करत असत, आणि ते निवृत्त झाल्यावर मणचेकरांनी ती पुर्ण जबाबदारी स्विकारली. कार्यालयीन बैठका, सभांचे फोटॊ काढणे, एल आय सी च्या “योगक्षेम” ह्या नियतकालीकात मुख व मलपृष्ठासाठी तसेच आतील पानांसाठी छायाचित्रे पुरवणे ही कामे ते करत असत. ह्या कालावधीत त्यांनी उत्तमोत्तम कॅलेंडरांची निर्मीती केली. त्यांच्या रचना कौशल्याने, १९८२ साली “योगक्षेम” ह्या नियतकालीकाला असोसीएशन ओफ बिझीनेस कम्युनिकेशन ओफ इंडीया चा उत्कृष्ट छायाचित्राचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या मनमिळवू स्वभावाने, प्रसन्न हास्याने, व सोबत्यांशी स्नेहपुर्ण वागण्याने उच्चपदस्थ अधिका-यांसोबत काम करतान त्यांना कधीच कोणती अडचण आली नाही.
मुंबईतील फोटोग्राफीक सोसायटी ओफ ईंडीयाचे सभासद झाल्यावर ते तेथील कार्यक्रमात सहभागी होऊ लागले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा प्रदर्शनांत त्यांनी अपार यश मिळवलं. त्यांना अनेक पारितोषिके मिळाली. १९८२ साली पी एस आय फोटोग्राफर ओफ द इयर हा पुरस्कार मिळाल्यावर त्यांनी स्पर्धा प्रदर्शनांत भाग घेणे थांबवले. १९८६ साली त्याना फेडरेशन इंटरनॅशनल ल आर्ट, बेल्जीयम ह्या युनेस्कोकडुन आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थेकडून “आर्टीस्ट एफ आय ए पी” (ए एफ आय ए पी) हा सन्मान मिळाला. काही काळ त्यांनी फोटोग्रफिक सोसायटी ओफ ईंडीयाचे सेक्रेटरी पद भुषवले व स्पर्धा प्रदर्शनांत भाग घेणा-या इतर सभासदांना मदत केली.
शाम मंचेकरांसोबत १९८४ साली पुण्यातील येरवडा येथील डॉ सलीम अली पक्षी अभयारण्याची भेट माझ्या चांगलीच स्मरणात आहे. मी तेथे वारंवार जात असे. शामने तेथे भेट देण्याची इच्छा प्रगट केल्यावर, एका शनीवारी आम्ही रात्री ११.३० ची शेवटची एशीयाड बस पकडून मुंबईहुन पुण्याला निघालो. पहाटे ५ वाजता पुणे एस टी स्टॅंडवर पोहोचलो. दिड तास बाकड्यावर विश्रांती घेऊन रिक्षाने मुळा मुठा नदीकाठी डॉ सलीम अली पक्षी अभयारण्यात पोहोचलो. सुर्योदयाच्या पुर्वीच्या निळ्या प्रकाशात बाहेर रस्यावर शेकोटीभोवती बसलेल्या माणसांशी थोड्या गप्पा मारून, त्यांचे फोटो काढून आम्ही नदीकाठी स्थिरावलो. संध्याकाळी सुर्यास्तापर्यंत आम्ही तेथे फोटो काढत होतो. मणचेकरांचा उत्साह, उत्सुकता आणी उर्जा अपरंपार म्हणावी अशीच होती.
शाम मंचेकरांसोबत १९८४ साली पुण्यातील येरवडा येथील डॉ सलीम अली पक्षी अभयारण्याची भेट माझ्या चांगलीच स्मरणात आहे. मी तेथे वारंवार जात असे. शामने तेथे भेट देण्याची इच्छा प्रगट केल्यावर, एका शनीवारी आम्ही रात्री ११.३० ची शेवटची एशीयाड बस पकडून मुंबईहुन पुण्याला निघालो. पहाटे ५ वाजता पुणे एस टी स्टॅंडवर पोहोचलो. दिड तास बाकड्यावर विश्रांती घेऊन रिक्षाने मुळा मुठा नदीकाठी डॉ सलीम अली पक्षी अभयारण्यात पोहोचलो. सुर्योदयाच्या पुर्वीच्या निळ्या प्रकाशात बाहेर रस्यावर शेकोटीभोवती बसलेल्या माणसांशी थोड्या गप्पा मारून, त्यांचे फोटो काढून आम्ही नदीकाठी स्थिरावलो. संध्याकाळी सुर्यास्तापर्यंत आम्ही तेथे फोटो काढत होतो. मणचेकरांचा उत्साह, उत्सुकता आणी उर्जा अपरंपार म्हणावी अशीच होती. दुपारी पाखरं झोपली तेव्हा आम्हीही जेवण उरकून वन खात्याच्या खोलीत विसावलो. तेथील वन कर्मचा-याशी गप्पा मारल्या. उन्हं थोडी उतरल्यावर पुन्हा फोटो काढले. संध्याकाळी शाम बसने मुंबईला परत निघाले. तो दिवस मला आठवतो कारण शामनी त्यांना आंतरराष्ट्रीय मोठ्या मानाची “चेअरमन्स ट्रॉफी” मिळाल्याचं मला सांगितलं.
मी अनभिज्ञपणे छायाचित्र स्पर्धा प्रदर्शनांबद्दल, पुरस्कारांबद्दल विचारलेल्या भाबड्या प्रश्नांना त्यांनी न कंटाळता सविस्तर उत्तरे दिली. स्पर्धा प्रदर्शनांमध्ये भाग घेताना काही पथ्य, नियम, बंधनं पाळावी लागतात. जुन्या जाणत्या कलाकारांच्या मार्गदर्शनानुसार छायाचित्रांचा दर्जा, निवड, पुरस्कार ठरवला जातो. स्वता:ची एक शैली स्थापित झाल्यावर शामनी ह्या स्पर्धाम्ध्ये भाग घेणं थांबवलं. त्यांच्या अमुर्त बंधनमुक्त कलाविष्कारात पोत, आकार, रंग, रेषा, छटा कलाकृती निर्माण करतात. “लॅंड ऍंड वॉटर” ह्या त्यांच्या पहील्या स्वता:च्या प्रदर्शनात त्यांच्या प्रतिभेची झलक पहावयास मिळाली. निसर्गचित्रे, लडाख, शैवाल, मोटारी, धार्मिक समारंभ, धरती, पाणी, झाडे; सगळ्या विषयांतून त्यांनी आपल्या स्वता:च्या ९ प्रदर्शनांमधून जगभरातल्या कलाविश्वात उच्चतम दर्जाचा कलाकार म्हणून स्वता:ची एक खास जागा निर्माण केली.
मार्च २००० मध्ये पिपल्स रिपब्लीक ऒफ चायनाने ” वर्ल्ड फोकसींग ओन बेजिंग” साठी निमंत्रित केलेल्या जगातल्या अप्रतिम छायाचित्रकारांमधून निवड झालेल्या ५० नावांपैकी एक शाम मणचेकर होते. भारतातील निवडल्या गेलेल्या दोघांपैकी ते एक होते. खर्चासह सर्व पंचतारांकीत व्यवस्था आंणी आदरातिथ्य ही परदेशात भारताचे प्रतिनिधीत्व करणा-या मंचेकरांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट होती.
१९८९मध्ये पी एस आय मध्ये शाम मंचेकर डिनोडियाचे सर्वोसर्वा, जगदिश अगरवाल यांना प्रथम भेटले. डिनोडियाच्या सोबतच्या प्रवासाबद्दल ते सांगतात ” डि पी ए च्या बैठकींमध्ये नियमीतपणे अनेक उत्तम छायाचित्रकारांना भेटण्याची संधी मिळत असे. कोणते फोटो विकले जातात हे इतरांचे छापुन आलेले काम पाहून कळत असे. वेगवेगळ्या विषयांची छायाचित्रे काढण्यास डिनोडिया उद्युक्त करत असे.
एक वेगळा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणूनही त्याचे महत्व मला वाटत असे.” जगदिश अगरवाल यांच्या बद्दल् बोलताना ते म्हणतात, “अत्यंत प्रामाणीक माणूस. अन्यथा, इतर ठिकाणी काय घडत सगळ्यांना ठाऊकच आहे.” शाम बहुधा सगळ्या बैठकींना हजर असे. त्यांच्या बरोबर वेगवेगळ्या विषयांवर बोलणे नेहमीच उद्बोधक ठरत असे. कला व छायाचित्रणाच्या क्षेत्रात काय घडते आहे, कोण कशा, कोणत्या प्र्तिमा निर्माण करत आहेत, नवी तंत्रे, नवी यंत्रे ह्या बद्दल त्यांना मोठं कुतुहल वाटत असे. त्यांच्या सोबत असताना त्यांच्या मनात, हृदयात सतत जागे असलेल निर्मीतीचा नवा प्रकल्प, नवा विषय, नव्या प्रतिमा ह्या संबंधीत विचार त्याच्या चेह-यावरुन, देहबोलितून, उर्जेतुन प्रकटताना दिसत असे.
कलानिर्मितिच्या ह्या स्वप्नवत प्रवासाकडे समाधानाने, अभिमानाने पहाताना शाम एल आय सी च्या योगदानाचा कृतज्ञपणे उल्लेख करतात. आगमी प्रदर्शनाविषयी विचारले असता त्यांनी सांगीतले, ” मी सर्वप्रथम विषय निवडतो. त्यावर दिर्घकाल विचारमंथन करतो. संकल्पना स्पष्ट होऊन छायाचित्रे काढणे आणि अंतिमता: ती प्रदर्शनात मांडणे ह्याकरिता दोन चार वर्षांचा अवधी ही लागू शकतो.” आज काल पुर्वीसारखे सगळीकडे सुरक्षीत वाटत नसल्याने, छायाचित्रणासाठी फिरण्यावर बंधने येतात हि खंत त्यांनी व्यक्त केली. पूर्वी वन-उद्यानांत, शहर वस्तीपासून दूर जाउन फोटो काढणे सुरक्षीत वाटत असे. आता महागडे कॅमेरे आणि इतर उपकरणे घेऊन एकांतात जाणे श्रेयस्कर वाटत नाही. ते म्हणतात, ” आज गटाने जाणेच योग्य ठरेल.”
हा सगळा निर्मिताचा उद्योग, कधी कधी मनाला, शरीराला थकवतो. ह्या संबंधात ते म्हणतात, “कशाला हा सतत नवीन निर्माण करण्याचा अट्टाहास, काहीसा हावरटपणाच, करत रहायचं? मी खूप काही मिळवलय, त्यातुन मिळालेल्या आयुष्यात मी अत्यंत समाधानी आहे.” परंतु पुन्हा विचार करुन ते सांगतात, ” पण आपणाला नव निर्मितिची, कलेचे नवीन प्रांत पादाक्रांत करायची तीव्र इच्छा, आकांक्षा, कायम असायलाच हवी नाहीतर तुम्ही संपलातच.”
अनिरुद्ध चेउलकर लिखित आणि प्रतिलेखन