Sept 2020 Vol 01 | Issue 02
Brick by Brick
सम्यक् दृष्टि – अमृत गांगर
मराठी अनुवाद – अनिरुद्ध चेऊलकर, एएफआयपी
नेत्र, त्याची यंत्रणा आणि दृष्टि तत्वज्ञान
छायाचित्रणाच्या नियतकालिकाचे नाव सम्यक् दृष्टि असणे हेच मुळात पहाण्याच्या अथांग क्रियेचा वेध घेण्याची अद्वितीय प्रक्रिया आहे. भारतिय तत्वज्ञानाप्रमाणे, कालातीत सत्य पाहणा-याला द्रष्टा म्हणतात. द्रष्टा दृष्याला साक्षी असतो; नेत्र किंवा दृष्टि ही म्हणजे कॅमेरा, एक यंत्र. अंतिमता: द्रष्ट्याच्या अंतर्चक्षुने सुयोग्यपणे भिंगांद्वारे शोध घेऊन समिप जाउन सम्यक् दृष्टि साध्य होते. हि एक दिर्घ, सखोल प्रक्रिया असून, त्या साठी कोणताही जलद तोकड्या आडमार्ग उपयोगाचा नाही; तांत्रीक, यांत्रीक त्वरीत मार्गांचा मोह अडचणीचाच ठरतो. सम्यक् दृष्टि (पाली भाषेत सम्मदित्ती) हि एक संथ, घीमी प्रक्रिया आहे. परंतु आज जेव्हा छायाचित्रणातील प्रतिमां वाढत्या प्रमाणात, फसव्या तांत्रीक बदलवण्याला बळि पडताना दिसते तेव्हा सम्यक् दृष्टिचे महत्व अधिकच वाढते.
दृष्टि, द्रष्टा आणी दृष्य ह्या त्रयीमधील एक प्रगल्भ सापेक्षता, दर्शनाच्या उच्च प्रतलावर पोहचून एक तत्वज्ञान घडते. दोन रंगांचे मिश्रण व्हावे त्याप्रमाणे, सम्यक शब्दापुढे जोडल्यामुळे ही सापेक्षता एका प्रवाही प्रगल्भतेला जन्म देते. सम्यक् दृष्टि म्हणजे अंतरंग, एक जवळीक. सम्यक् दृष्टिचे तत्वज्ञान अथवा व्यावहारीक कल्पना, दृष्य, दृष्टि आणि द्रष्टा ह्यांचे सक्षम समीकरण बांधून सम्यकत्व म्हणजेच योग्य मार्ग दाखवते.
दर्शनस्वरूप बौद्धधर्म व जैनधर्म
बौद्धधर्म व जैनधर्म दोन्ही ही मुलता: महान दर्शन, एका प्रकारची उपयोजित तत्वज्ञाने आहेत जी “दर्शन” ह्या शब्दासोबत सम्यक जुळल्यावर स्वतंत्र तसेच एकत्र होणारा चैतन्यमय सापेक्ष रासयनीक बदल जाणू शकतात. दर्शन संकल्पना भारतीय तत्वज्ञान व अध्यात्मात सारख्याच अनुभूती आहेत. सत्यदर्शन वा सम्यक दर्शन साधण्यासाठी किंवा सत्यानुभुतीची मुलतत्व प्राप्त करण्यासाठी तीन मुख्य टप्प्यांतून पार पडावे लागते. (अ) श्रवण, ज्यांच्या दर्शनाची आसक्ती आहे अशा अनुभवी सिद्ध व्यक्तीकडून ज्ञान प्राप्ती अथवा त्यांच्या सामायीक ध्वनीमुद्रीत सत्संगाचे श्रवण. (ब) ज्याचे श्रवण, मनन केले त्यावर चर्चा, तर्क, विचार ह्यावर ध्यान अभ्यास. (क) पूर्वग्रहविरहीत, दुख: त्यागलेल्या मनाने संबंधीत विषयात प्रवेश करून पूर्णपणे लक्ष केंद्रीत करणे.
खरं पहाता, बौद्धधर्म व जैनधर्म दोन्ही जीवन जगण्यासंबंधीची माहीती पुस्तके आहेत. प्रत्यक्षात ति अनुसरणे “सहज”, विनाकष्ट आहे त्याच वेळी गुंतागुंतीचे आहे. पाली भाषेत बौद्धधर्माला धम्म असे संबोधीतात. ह्याचा अर्थ जो जोपासतो, आधारभूत असतो. पाश्चात्य विचारप्रणली प्रमाणे मानतात तसा हा “धर्म” नाही. पाली भाषेतील ह्या शब्दाचा अचूक अर्थ सांगू शकेल असा शब्द इंग्रजीमध्ये नाही. सम्यक् दृष्टिचा संबंध ज्याला सम्म, जे योग्य आहे व मिच्चा म्हणजे अयोग्य आहे ह्यावरून आपण सत्य मानतो त्याच्याशी आहे. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर काय उपयुक्त आहे व काय अपायकारक आहे ह्या मधील विवेक.
दुस-या शतकातील महाप्रदज्ञापरमिताशास्त्र, धम्माच्या दिव्य आठ मार्गांची सुरुवात (पाली : अरिया अत्थांगिका मग्गा; संस्कृत : आर्यष्टांगमार्ग ) सम्म (पाली) वा सम्यक (संस्कृत) ह्या शब्दाने, म्हणजेच ’योग्य, जसे असायला हवे तस’ ह्याने होते. ह्या अष्टमार्गांत आठ एकत्रित अनुसरायच्या कार्यांचा समावेश होतो. योग्य दृष्टीकोन, योग्य ठराव, योग्य वचन, योग्य वागणे, योग्य जगणॆ, योग्य प्रयत्न, योग्य ध्यान आणि योग्य समाधी. ( ध्यानमग्न व्यग्रता वा सामावणे). सम्यक् दृष्टि ही ह्या अष्टमार्गातील प्रथम घटक आहे. हा मार्ग दुखा:चा नाश करतो.
तत्वार्थ सुत्रातील महत्वाचे जैन लिखाण सम्यग्दृष्टिचा योग्य मार्ग म्हणजेच योग्य भक्ती असा उल्लेख करतात. दुस-या ते पाचव्या शतकात लिहिलेल्या तत्वार्थ सुत्राची सुरुवात सम्यग्दर्शनज्ञानचारित्राणि मोक्षमार्ग, मुक्तीचा सम्यक मार्ग , ज्या मध्ये योग्य दृष्टी, योग्य ज्ञान आणि योग्य आचार समाविष्ट आहेत. अर्थातच येथे सम्यक दृष्टीवर समान भर आहे.
सम्यक दृष्टीबद्दल वा सम्यक दृष्टी वरील ह्या प्रवचनात जैन अनेकान्त तत्व, जे संकल्पित रचना बांधायचा प्रयत्न करते, त्याच वेळी वास्तवाच्या अनेकविध दृष्टीकोनांना वाव देते. ह्याचा उद्देश, वास्तवाच्या संकल्पनां तयार करून ओळख आणि वेगळेपण, कायमत्व अणि बदल ह्यांचा समावेश करणे. त्यामुळे हे टोकाच्या, एककल्ली भुमिका मांडत नाही. बौद्धधर्म व जैनधर्म दोन्ही विश्वाचा निर्माता कुणी आहे असे मानत नाही. त्याला ते अनंत बदल आणि पुनर्बदलची प्रक्रिया मानतात. सततच्या परीवर्तनातून हे पार्थीव जग निर्माण होते व भूत व भविष्य दोन्ही अंतहीन आहेत.
छायाचित्रणाच्या नियतकालिकाचे नाव सम्यक् दृष्टि असणे हेच मुळात पहाण्याच्या अथांग क्रियेचा वेध घेण्याची अद्वितीय प्रक्रिया आहे. ही अत्यावश्यक मुळातुनच, (वास्तव) जन्मण्याची आणि पहाण्याची क्रांतीकारक प्रक्रीया आहे,
अस्तु:
Amrit Gangar
Mumbai-based film theorist, curator and historianHe has to his credit three books on German filmmakers and a musicologist, viz. (a) Franz Osten and the Bombay Talkies: A Journey from Munich to Malad, 2001; (b) Paul Zils and the Indian Documentary, 2003; (c) Walter Kaufmann: The Music that Still Rings at Dawn, Every Dawn, 2013. All these three books have been published by the Goethe Institut (Max Mueller Bhavan), Mumbai.
Gangar was the consultant curator of the National Museum of Indian Cinema, Mumbai which is India’s first national film museum under Government of India. He has also curated film programs for the Kala Ghoda Artfest, Mumbai; Kochi-Musziris Biennale, Kerala; Danish Film Institute, Copenhagen, etc. He has presented his theory of Cinema of Prayoga at various venues in India and abroad, including the Pompidou Centre, Paris; the Tate Modern, London; Kala Bhavana, Santiniketan; West Bengal; NCPA, Mumbai, etc. He writes both in English and Gujarati languages and has been awarded by the Gujarat Sahitya Akademi, Gandhinagar.
Aniruddha Cheoolkar
AFIPAniruddha Cheoolkar is doing photography, some commercial but mostly pictorial for last five decades. His special interest in photomicrography, taking photos through the microscope, has helped many post graduate and doctoral students in thefield of biology. Working at an environmental research laboratory he found time to teach photography, to write about his tours and experiences. He loves to read. He expresses himself fondly in poetry. His book titled “30@30” showcasing the interviews of 30 photographers was published by Jagdish Agarwal, founder of DPL.